अपघात ग्रस्त महिलेला नुकसान भरपाई नाकारणाऱ्या एम एस ई बी ला माहिती अधिकाराचा दणका

सुनंदा भास्कर साळुंखे काच आणि कागद गोळा करणारी एक विधवा महिला दोन वर्षांपूर्वी निगडी तळवडे भागांमध्ये काच कागद गोळा करत असताना एम एस ई बी च्या डीपी बॉक्स जवळील उघड्या वायर वर पाय पडल्यामुळे 65 टक्के भाजली त्यावेळी आमच्या संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे यांनी मित्रांच्या मदतीने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि उपचार चालू केले आणि तिथूनच चालू झाला एम एस सी बी चा भोंगळ कारभार सुरुवातीला निगडी एम एस ई बी चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी यांनी यासंदर्भात तक्रार घ्यायला नकार दिला त्यानंतर आम्ही माहिती अधिकार कायद्याचा बडगा उगारताच तक्रार दाखल झाली त्यानंतर पोलीस पंचनामा हॉस्पिटल सर्टिफिकेट ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली पण निष्पन्न काहीच होईना याउलट एम एस सी बी ने त्या काळात सदरचा डीपी बॉक्स बंद होता असा खोटा अहवाल दिला त्यामुळे आम्ही विद्युत निरीक्षक पुणे यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार दिली आणि मग मात्र विद्युत निरीक्षक आणि त्यांची कमिटीने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन रीतसर अहवाल दिला आणि यामध्ये एमएसईबीची चूक असून नुकसान भरपाई एमएसईबीने द्यावी असा स्वयं स्पष्ट अहवाल दिला परंतु कार्यकारी अभियंता श्री चौधरी कुठलीही कार्यवाही करण्यास तयार नव्हते तथापि आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी सतत तक्रार देऊन याशिवाय श्री चौधरी यांची येथून तात्काळ बदली करण्यासाठी आम्ही पत्र व्यवहार केला यानंतर आम्ही सर्व ठिकाणी माहिती अधिकार अर्ज टाकून प्रत्येक विभागाकडे या प्रकरणाचे काय झाले याबाबत माहिती घेतली आणि आम्हाला माहिती मिळाली की सदर प्रकरणी एमएसईबी नुकसान भरपाई देण्यास तयार आहे तथापि काही महत्त्वाचे कागदपत्र त्यांना हवे होते जे चौधरी यांच्याकडे होते आम्ही चौधरींकडे माहिती अधिकारात कार्यालयाची पाहणी करून असंख्य त्रुटी निदर्शनास आणून दिल्या वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून सर्व कागदपत्रे देण्यास भाग पाडले आता फक्त विषय 65 टक्के भाजल्याचा होता सदरचे प्रमाणपत्र हे खाजगी हॉस्पिटलने दिले होते त्यामुळे आम्ही औंध सिविल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन संबंधित महिलेची परिस्थिती आणि घटनाक्रम समजावून सांगितला व त्यांनी त्यास मान्यता देऊन सदर सर्टिफिकेट बरोबर असल्याबाबत सही शिका दिला आणि आपणास क कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमच्या या प्रयत्नाला यश येऊन सदर प्रकरणी एम एस ई बी ने नुकसान भरपाई म्हणून एक लाख तीस हजार रुपये मंजूर केलेले आहे एका विधवा महिलेला न्याय मिळवून दिल्याचा एक आनंद महासंघाला होत आहे आणि याचे खरे शिल्पकार आहेत अशोक कोकणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

×