बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील चिरंजीव भूषण विजय पाटील आणि चिरंजीव भूषण पंडितराव पाटील या दोन विद्यार्थ्यांच्या नावातील साधर्ममुळे अमरावती मधील संत गाडगेबाबा विद्यापीठाने गुणपत्रिकेत चूक केली होती तीन महिन्यापासून सदरची चूक दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठ टाळाटाळ करत होते तक्रार आल्यानंतर आम्ही फक्त त्यांना माहिती अधिकारात अर्ज करतोय एवढेच सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी संबंधित विद्यापीठाने विद्यार्थ्यांना बोलवून चूक दुरुस्त करून सुधारित गुणपत्रिका मुलांना दिली