शाळेच्या मूळ प्रमाणपत्र परत देण्यासाठी दीड लाख रुपये मागणाऱ्या कॉलेजला माहिती अधिकार कायदा समजावून सांगताच तात्काळ सर्व कागदपत्रे विद्यार्थ्याला परत

कुमारी कोमल किशोर खडके राहणार उमरखेडा तालुका मंठा जिल्हा जालना येथील ही विद्यार्थिनी ने पिंपरी चिंचवड मधील एका नामांकित कॉलेजमध्ये एमबीए करिता प्रवेश घेतला होता व प्रवेश फि रुपये वीस हजार ऑनलाईन भरली होती तथापि काही अडचणीमुळे सदर मुलीला पूर्ण फी रु
4 लाख 50 हजार भरणे शक्य नव्हते त्यामुळे तिने सदर शाळेला मूळ शैक्षणिक कागदपत्रे परत करण्याची विनंती केली पण सदर कॉलेजने तिचा अर्ज भीरकावून लावत कमीत कमी दीड लाख रुपये भरल्याशिवाय मूळ कागदपत्र मिळणार नाही असे सांगितले होते सदरची तक्रार आमच्याकडे आल्यानंतर संस्थेने सदर शाळेच्या प्रिन्सिपल यांच्याशी फोनवर चर्चा करून आम्ही माहिती अधिकार समिती आपल्या भेटीला येणार आहोत एवढेच सांगितले आणि एवढ्यावरच काम झाले सदर शाळेने मुलीला बोलावून सर्व मूळ कागदपत्रे परत केली याशिवाय तिने भरलेले रुपये वीस हजार हे देखील रोख परत केले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

×