गणेश अमृत क्षीरसागर या व्यक्तीने बोगस बक्षीस पत्र तयार करून वडिलांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसात तलाठी कार्यालयात अर्ज करून प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता आणि कुमारी नेहा अमृत क्षीरसागर आणि तिच्या आईला प्रॉपर्टीतून बेदखल करून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता कुमारी नेहा अमृत क्षीरसागर
यांच्या तक्रारीवरून जागृत नागरिक महासंघाने माहिती अधिकाराचा वापर करून तिच्या भावाने दाखल केलेले बक्षीस पत्र हे बोगस असल्याचे सिद्ध केले आणि सदर मुलीला आणि आईला न्याय मिळवून दिला सदर प्रॉपर्टीचे आजचे बाजार किंमत जवळपास अडीच कोटी आहेत
मित्रांनो अशी शेकडो उदाहरणे देता येईल याची माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून आम्ही सोडवलेली आहेत हे करत असताना आमचे संपूर्ण कार्यकारी मंडळ आणि महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते माझ्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात त्यामुळे या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे