एमएसइबीच्या हलगर्जीपणा मुळे उघड्या वायरींवर पाय पडल्यामुळे भाजलेले महीलेला नुकसान भरपाई मिळवुन दिली

जागृत नागरिक महासंघ (माहिती अधिकार प्रचार प्रकारचे समिती)
दि 25/8/2023

  एमएसईबीच्या डीपी बॉक्स मधील उघड्या वायरवर पाय पडून 65 % भाजलेल्या श्रीमती सुनंदा भास्कर साळुंखे यांना जागृत नागरिक महासंघाच्या अथक प्रयत्नानंतर एमएसईबी ने रु 130000/- नुकसान भरपाई दिली सदर संदर्भात मंजुरीचे पत्र व बँक खात्यात जमा झालेली रक्कम बाबतचे पेपर श्रीमती साळुंखे यांना एमएसईबी भोसरी विभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता देशमुख साहेब आणि कर्मचारी बोरकर मॅडम यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले सदर प्रसंगी श्री देशमुख साहेबांनी महासंघाचे अखंडित पाठपुराव्याबद्दल अभिनंदन केले त्याच वेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी सुद्धा विशेष करून कर्मचारी बोरकर मॅडम यांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले माहिती अधिकाराच्या  माध्यमातून मिळालेली सदरची रक्कम म्हणजे माहिती अधिकार कायद्याचा सकारात्मक वापर केल्यामुळे मिळालेले एक उत्तम असे फळ आहे त्यामुळे सर्वांनी माहिती अधिकार कायद्याचा 100% सकारात्मक वापर करावा तसेच  शासन प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करावे असे नितीन यादव यांनी आवाहन केले यावेळी संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे यांनी सदर प्रकरणात अशा पद्धतीने पाठपुरावा केला याची थोडक्यात माहिती दिली यानंतर एमएसईबीने सुरक्षिततेबाबत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे उद्घाटन केले श्रीमती साळुंखे यांनी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव आणि अशोक कोकणे तसेच एमएसईबी चे सुद्धा आभार मानले यावेळी संस्थेचे सचिव उमेश सणस सदस्य मच्छिंद्र कदम उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा सदस्य राजू डोगीवाल तसेच पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे व अध्यक्ष नितीन यादव आणि एम एस सी बी चे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

नितीन शशिकांत यादव 
अध्य

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

×