दिव्यांग व्यक्तीचा पंधरा वर्षापासून घरकुल लाभ केवळ माहिती अधिकारामुळे मंजूर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबवलेल्या स्वस्त घरकुल योजनेसाठी 2008 साली अर्ज केलेल्या एका दिव्यांग व्यक्तीला मागील पंधरा वर्षापासून सदरचा लाभ मिळत नव्हता सदर दिव्यांग व्यक्तीने याचा अनेकदा पाठपुरावा केला पण यश आले नाही तथापि जागृत नागरिक महासंघाच्या एका माहिती अधिकार अर्जाने सदर दिव्यांग व्यक्तीला घरकुल चा लाभ मिळाला आज घरकुल मधील फ्लॅट ची किंमत 25 लाख रुपये असताना सदर व्यक्तीला केवळ चार लाखांमध्ये सदर चा लाभ मिळालेला आहे आणि एका दिव्यांग व्यक्तीला मदत केल्याचा महासंघाला आनंद आहे अशीच एक दुसरी घटना आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काळेवाडी फाटा ते के एस बी चौक असा दीडशे फूट रुंदीचा रस्ता बनवलेला आहे सदर रस्त्यांमध्ये मनोज तुकाराम हतमकर या भाडेकरूच्या मालकाची सर्व जागा बाधित झाली होती त्यावेळी सदर भाडेकरूला सुद्धा विस्थापित व्हावे लागले होते त्यामुळे श्री हातामकर यांनी घरकुल मधील योजनेत लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेला होता पण महानगरपालिकेने जवळपास 10 वर्षे सदर व्यक्तीला लाभ दिला नाही पण जागृत नागरिक महासंघाने वर्ल्ड बँकेची पत्रव्यवहार करून माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदर व्यक्तीला घरकुलचा लाभ मिळवून दिला माहिती अधिकार कायद्याचा एक अर्ज काय काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

×