सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बिचुकले या गावात राहणाऱ्या श्रीमती वैजंता शंकर कदम वय वर्षे 78 यांचा पाणीपुरवठा विकास कामांमध्ये ग्रामपंचायतीने तोडला होता व तो पाईप पुन्हा जोडून देण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करत होती त्यावेळी सदर 78 वर्षीय महिला पाण्यासाठी सार्वजनिक नळावर जात होती त्यावेळी कोरोनाची अत्यंत धोकादायक स्थिती होती जागृत नागरिक महासंघाने संबंधित ग्रामपंचायतीला फक्त तोंडी माहिती अधिकार कायदा समजावून सांगितला आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतिने नळजोड पूर्ववत करून दिला माहिती अधिकार कायदा चा बडगा यालाच म्हणतात