एम एस ई बी ने रु 130000/-(रु एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई दिली

जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकार प्रचार प्रसार प्रशिक्षण समिती दि 18/8/2023
एम एस ई बी ने रु 130000/-(रु एक लाख तीस हजार) नुकसान भरपाई दिली
जागृत नागरिक महासंघाच्या 3 वर्षे पाठपुराव्याला अखेर यश
श्रीमती सुनंदा भास्कर साळुंखे ही विधवा महिला तळवडे भागामध्ये काच कागद गोळा करत असताना एम एस ई बी च्या डीपी बॉक्स मधील उघड्या विद्युत वायरवर पाय पडून 65% भाजल्या होत्या याबाबत पोलीसांकडे रीतसर पंचनामा करून एमएसईबी कार्यालयात तक्रार दाखल करण्यास गेले असता एमएसीबीने तक्रार घेतली नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी महासंघाने वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कार्यालयाने या महिलेची तक्रार घेतली पण सदर कार्यालयाने त्यांची कुठलीही चूक नसल्याचे सांगून सदर महिलेला बाहेरचा रस्ता दाखवला महासंघाने याविरुद्ध विद्युत निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग येरवडा पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली विद्युत निरीक्षक विभागाने चौकशी समिती नेमून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तक्रारीमध्ये तथ्य असून सदर महिलेला उघड्या विद्युत तारेवर पाय पडून अप्राणांतीक अपघात झाला आहे त्यामुळे संबंधित महिलेला नुकसान भरपाई एमएसईबी ने द्यावी असा आदेश दिला तरीदेखील एमएसईबी ने ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला आमचा विद्युतसंच बंद होता अशी खोटी करणे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण महासंघाने या गोष्टीचा सतत तीन वर्षे पाठपुरावा करून सदर महिलेला रु 130000/- नुकसान भरपाई देण्यास एमएसईबी ला भाग पाडले
14/12/2020 रोजी विद्युत निरीक्षकांनी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते पण
एमएसईबीच्या गलथान कारभारामुळे ही रक्कम मिळण्यास उशीर झाला
माहिती अधिकार कायद्याचा सकारात्मक वापर करून आपाल्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळू शकते याच हे एक ज्वलंत उदाहरण आहे या कामात जागृत नागरिक महासंघाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक वामन कोकणे यांचा सिंहाचा वाटा आहे आम्हाला त्यांचा निश्चित अभिमान वाटतो एका गरीब विधवा महिलेला रुपये एक लाख तीस हजार नुकसानभरपाई मिळवून दिल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे धन्यवाद

नितीन शशिकांत यादव
अध्यक्ष
जागृत नागरिक महासंघ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

×