एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारे एनसीएमसी कार्डच्या अतिरिक्त शुल्क वसुली बाबत तक्रार (जागृत नागरिक महासंघाने केलेला पाठपुरावा)

जागृत नागरिक महासंघाने नुकतेच गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी वल्लभनगर एसटी स्टँड च्या विभाग नियंत्रक श्रीमती पल्लवी पाटील यांची भेट घेतली भेटी दरम्यान एन सी एम सी कार्ड च्या अतिरिक्त शुल्क वसुली तक्रार संदर्भात चर्चा करण्यात आली सदर कार्ड च्या वाटपा संदर्भात ज्यांना ठेका दिला आहे त्या ठिकेदाराकडून 199 रुपये ऐवजी 250 रुपये वसूल केले जातात अशी तक्रार महासंघाकडे आलेली होती त्या अनुषंगाने श्रीमती पाटील यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली त्यावेळी सदर ठेकेदाराला बोलावून श्रीमती पाटील यांनी तक्रारी विषयी विचारले असता त्याने काही लोकांकडून 199 ऐवजी 250 रुपये घेतले कबूल केले व इथून पुढे अशी चूक होणार नाही असे म्हणत क्षमा मागितली त्यामुळे सदर विषयावर पडदा पडला तथापि अशा पद्धतीने शासन सेवेत कुठेही अतिरिक्त वसुली होत असेल तर नागरिकांनी जागृत राहून त्याचा योग्य पाठपुरावा करावा असे महासंघाचे स्पष्ट मत आहे यावेळी महासंघातर्फे अध्यक्ष नितीन यादव पिंपरी चिंचवड शहर प्रमुख कोकणे व सदस्य गणेश हातमकर तसेच एसटी महामंडळातर्फे वल्लभ नगर एसटी विभाग नियंत्रण श्रीमती पल्लवी पाटील व स्थानक प्रमुख श्रीमती वैशाली कांबळे उपस्थित होते यावेळी श्रीमती पाटील यांनी ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल महासंघाचे आभार मानले शिवाय अशा संस्थांचा आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतो असे सांगितले धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *