पिं चिं मनपा आरोग्य विभाग या ठिकाणी आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी माहिती अधिकार प्रथम अपील सुनावणी संपन्न झाली यावेळी सुनावणीसाठी जन माहिती अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल तीव्र संताप व नाराजी व्यक्त करत माहिती न देणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्यांवर शो कॉज नोटीस बजावण्याचे आदेश मा अपील अधिकारी अमित पंडित साहेब यांनी दिले शिवाय माहिती पुढील 7 दिवसात दिली नाही तर शिस्तभंगाची व रु 25000 दंडाची राज्य माहिती आयोगाकडे शिफारस केली जाईल असे आदेशात नमूद आहे यावेळी अपील कर्ता नितीन यादव तसेच जागृत नागरिक महासंघाचे सचिव राजू डोगीवाल तसेच किशोर देशपांडे आणि ताठे इत्यादी सभासद उपस्थित होते


